कन्या विद्यालयात जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST2021-01-04T04:28:01+5:302021-01-04T04:28:01+5:30
बीड : येथील शाहू आय.टी.आय. राजर्षी शाहू कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तेलगाव रोड येथे संस्थेच्या प्रांगणात क्रांतिज्योती सावित्रीबाई ...

कन्या विद्यालयात जयंती
बीड : येथील शाहू आय.टी.आय. राजर्षी शाहू कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तेलगाव रोड येथे संस्थेच्या प्रांगणात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य ए. आर. डंबरे, मुख्याध्यापिका श्रीमती कदम, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रम
बीड: तालुक्यातील पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाटोदा बेल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धनवंत मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच पाटोदा (बेल) येथील महिला उपस्थित होत्या.
महिला शिक्षण दिन
बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात रासेयो विभागाच्या वतीने महिला शिक्षण दिन साजरा झाला. प्रमुख वक्त्या प्रा. वर्षा भोसले, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील त्रिभुवन उपस्थित होते. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.अरुण दैतकार यांनी केले. समन्वयक प्रा. ब्रह्मनाथ मेंगडे यांनी आभार मानले.
जयंतीनिमित्त कार्यक्रम
बीड : ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्या जयंतीनिमित्त येथे अ. भा. महात्मा फुले समता परिषदच्या वतीने अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, शहराध्यक्ष निखिल शिंदे, पंकज बाहेगवाहकर, मनोज भानोसे, महेश चौधरी, बालाजी बहिरवल आदी उपस्थित होते.