शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 11:42 PM

जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : अभ्यासू, शांत, संयमी, विकासदृष्टीच पर्याय

बीड : जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.शनिवारी जालना रोड भागातील माळी गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत बाळासाहेब पिंगळे व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी सुनील अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक शिवाजी जाधव, नवनाथ शिंदे, अशोक काळे, प्रकाश कोकाटे, कल्याण कवचट, सचिन काळे, लक्ष्मण गुंजाळ, कैलास लगड, देवा पेंढारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पिंगळे म्हणाले, शहरातील माळी नगर, विठ्ठल मंदिर परिसर हा मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून शहराचा विकास आणि शासनाच्या विविध योजना कोण पाठपुरावा करून आणू शकतो, हे सर्वांना माहीत आहे.ही विधानसभेची निवडणूक आहे आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, त्याला विकासाची तळमळ आणि योग्य विचार तसेच निर्णय घेण्याची क्षमता असणारा असावा. मागील काळात या भागात रस्ते, नाल्या, पाण्याची काय परिस्थिती होती हे आपण सर्वजण जाणता.शहराचा कायापालट करण्यासाठी आण्णांसारखा चारित्र्यसंपन्न, अभ्यासू व शांत, संयमी असा योग्य पर्याय आपल्यासमोर असून त्यांना विधानसभेत आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याची आवश्यकता असल्याचे बाळासाहेब पिंगळे म्हणाले.यावेळी सुनिल अनभुले, नगरसेवक भास्कर जाधव, कैलास लगड, अशोक काळे यांनी भाषण केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गुंंजाळ यांनी केले. यावेळी परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, व्यापारी, महिला, पुरूष, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधीनगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाने शहराच्या विकासासाठी न्याय दिला नाही तर शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. एकाच बैठकीत शहर विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला.बीडच्या रेल्वेचे कामासाठी स्व.काकूंनी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन सरकाने थोडाफार निधी देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले. पण मोदींसह पालकमंत्र्यानी बीडच्या रेल्वेच्या कामाला योग्य निधी देवून कामास गती दिली.नॅशनल हायवेचे काम, अमृत अटल योजना, ड्रेनेज योजनेला निधी देवून राज्य आणि केंद्र शासनाने बीडकरांना न्याय दिला असून शहर विकासाचे काम करणाऱ्या अण्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना