Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २० दिवस उलटले, पण अजूनही अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मार्चा सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणार आहे. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसापासून अंजली दमानिया यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन बीडमधील गुन्हेगारीचे पुरावे देत आहेत. बीड जिल्ह्यात उघड-उघड हत्यार वापरत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी सरपंच देशमुख यांच्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणीही केली आहे.
मोठी बातमी: वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी
दरम्यान, आज त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडले नसलेल्या तीन आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला आहे. याबाबत मला फोन आल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती आपण पोलिसांना दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजिनामा अजूनही का घेत नाहीत? असा सवालही दमानिया यांनी केला. तसेच वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणीही त्यांनी केला.
अंजली दमानिया म्हणाल्या, "काल रात्री १२ वाजताच्या दरम्यान मला एक फोन आला. त्यांनी मला व्हॉट्स अॅपवर कॉल घेण्यास सांगितले. मी व्हॉट्स अॅपवर कॉल केला तर तो झाला नाही. त्यांनी मला व्हाईस मेसेज पाठवले. यात त्यांनी सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपी मिळणारच नाहीत, कारण त्यांचे मर्डर झाले आहेत. याची माहिती मी एसपींकडे दिली आहे, असंही दमानिया म्हणाल्या.
वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी
केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवणचक्कीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची पत्नी मंजीली कराड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीने शुक्रवारी साडे नऊवाजेपर्यंत चौकशी केली. जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना तर लातूरहून पोलिस वाहनातून बीडला आणण्यात आले होते. त्यांना आता शनिवारी पुन्हा हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे.