जनावरांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:13+5:302021-02-08T04:29:13+5:30
रस्त्यावर धुळीचे थर परळी : शहरात सर्वत्र रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा ...

जनावरांचा ठिय्या
रस्त्यावर धुळीचे थर
परळी : शहरात सर्वत्र रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करून रस्ते स्वच्छ ठेवण्याची मागणी आहे.
गतिरोधकाची दुर्दशा
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.
सिग्नल बंदच
बीड : मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेकवेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता होईना
माजलगाव : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून न.प.ने स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.