बीडमध्ये एमपीएससीचे संतप्त विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:33+5:302021-03-13T04:59:33+5:30
बीड : अवघ्या तीन दिवसांनी १४ मार्च रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ...

बीडमध्ये एमपीएससीचे संतप्त विद्यार्थी रस्त्यावर
बीड : अवघ्या तीन दिवसांनी १४ मार्च रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतल्यानंतर ही परीक्षा देणारे शहरातील शेकडो विद्यार्थी गुरूवारी रस्त्यावर उतरले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत घोषणाबाजी करत या निर्णयाचा विरोध करण्यात आला. आयोग आणि सरकार टोलवाटोलवी करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कोरोनाचे नियम आम्हालाही कळतात. बस, रेल्वे, उद्योग सर्व सुरू असताना कोरोनाच्या नावाखाली परीक्षा कशामुळे पुढे ढकलता, असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी केला. मार्च २०२० ची राज्यसेवा परीक्षा एप्रिल व सप्टेंबर आणि आता ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना असून शासनाने फेरविचार करून नियोजित वेळापत्रकानुसार १४ मार्च रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनींनी केली.