शेतकऱ्यांचा संताप, पुतळ्याला मारले आसूडाचे फटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:01+5:302021-04-12T04:31:01+5:30
माजलगाव : तालुक्यातील मोठेवाडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करून फुले यांच्या प्रतिमेच्या साक्षीने शासनाच्या ...

शेतकऱ्यांचा संताप, पुतळ्याला मारले आसूडाचे फटके
माजलगाव : तालुक्यातील मोठेवाडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करून फुले यांच्या प्रतिमेच्या साक्षीने शासनाच्या निषेधार्थ भाजीपाला व फळे फेकून देत प्रतीकात्मक पुतळ्याला आसूडाचे फटके देत रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. भाजीपाल्यासह फळांचा लिलाव बाजार समितीने सुरू करावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा बाजार समिती व प्रशासनाला दिला होता. परंतु कोविड १९ च्या धर्तीवर पोलीस प्रशासनाने कलम १४९ प्रमाणे नोटीस देऊन आसूड आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यामुळे भाई ॲड. नारायण गोले यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या वतीने मोठेवाडी येथील लिंबोणीच्या शेतात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करुन, प्रतिमेच्या साक्षीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शासनाच्या निषेधार्थ फळे व भाजीपाला फेकून देत प्रतीकात्मक पुतळ्याला आसूडाचे फटके देत आंदोलन करण्यात आले.
यावेळी लहू सोळंके, मुंजा पंचाळ, कडाजी नावडकर,रोहन आकुसकर,मोहन इंगळे,रंजित जाधव,आमोल गोले,भालचंद्र सोळंके, गणेश सोळंके व अभिजीत आठवे यांची उपस्थिती होती.
===Photopath===
110421\purusttam karva_img-20210411-wa0033_14.jpg