रामगड महंतपदी अमोल महाराज धांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST2021-04-04T04:35:18+5:302021-04-04T04:35:18+5:30

बीड : रामगड हे पुरातन व थोरले संस्थान आहे. लक्ष्मण महाराजांच्या प्रयत्नातून येथे प्रगती झालेली आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त ...

Amol Maharaj Dhande as Ramgad Mahant | रामगड महंतपदी अमोल महाराज धांडे

रामगड महंतपदी अमोल महाराज धांडे

बीड : रामगड हे पुरातन व थोरले संस्थान आहे. लक्ष्मण महाराजांच्या प्रयत्नातून येथे प्रगती झालेली आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व नूतन महंत अमोल महाराज धांडे यांच्या पुढाकारातून नारायणगडाप्रमाणे रामगडाचाही विकास होईल, असा विश्वास महंत शिवाजी महाराज यांनी रामगड येथे व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातील विख्यात श्री रामचंद्र प्रभू रामगड देवस्थान येथील महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजेच्या दिवशी अल्पशा आजाराने देहावसान झाले.

त्यामुळे पुढील उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. मागील ५ दिवसांपासून रामगडचा उत्तराधिकारी नेमण्यात मतमतांतरामुळे अडचणी निर्माण होत होत्या. शनिवारी रामगडाचे सहावे महंत म्हणून धांडे महाराजांची घोषणा करून त्यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज व बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी पुढाकार घेऊन पंचक्रोशीतील कुमशी, कांबी, घोसपुरी, वासनवाडी, जिरेवाडी, आनंदवाडी, खापरपांगरी, द.शहाजनपूर, सौन्दाना, कामखेडा, पेंडगाव, नामलगाव, माळापुरी, लोळदगाव, शिदोड, किन्हीपाई आदी गावांतील भक्त व ग्रामस्थांशी चर्चा करून एकमुखाने निर्णय घेण्याचा अधिकार महंत शिवाजी महाराज यांना देण्यात आला. कुमशी व सौंदाना येथील ग्रामस्थांचे वेगळे मत होते. अखेर आपापसात चर्चा झाल्यानंतर महंत शिवाजी महाराज यांनी ह.भ.प.अमोल महाराज धांडे यांचे नाव घोषित केले. याला सर्वांनी अनुमती दिली.

यावेळी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज व बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे, संभाजी महाराज, रामगडाचे विश्वस्त राजेंद्र मस्के, कुंडलिक खांडे, हेमंत क्षीरसागर, शिवराज बांगर, बबन गवते, सखाराम मोहिते, मसुराम कदम, जिजा चव्हाण, कोंडिबा निकम, कल्याण पवार, महादेव उबाळे, संदीप उबाळे यांच्यासह पंचक्रोशीतील उपस्थित भाविक भक्तांच्या एकमुखी निर्णयाने ह.भ.प. अमोल महाराज धांडे यांची रामगड देवस्थानचे मठाधिपती म्हणून निवड घोषित करून विधीवत रामगडाच्या गादीवर बसवण्यात आले. ह.भ.प. अमोल महाराज हे मूळ शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर गात येथील रहिवासी असून महंत शिवाजी महाराज यांचे ते शिष्य आहेत.

Web Title: Amol Maharaj Dhande as Ramgad Mahant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.