गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळेंची हॅट्ट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:07+5:302021-04-02T04:35:07+5:30

येथील वकील संघाची निवडणूक दरवर्षी घेण्यात येते. याहीवर्षी वकील संघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ३ ...

Amit Mulen's hat trick as the president of Gevrai Bar Association | गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळेंची हॅट्ट्रीक

गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळेंची हॅट्ट्रीक

येथील वकील संघाची निवडणूक दरवर्षी घेण्यात येते. याहीवर्षी वकील संघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ३ , उपाध्यक्ष पदासाठी ४ तर सचिव पदासाठी ३ असे एकूण १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीचा त्याच दिवशी दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. यात अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. अमित मुळे यांना १०२ सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तर ॲड. पी. पी. जरांगे यांना सर्वाधिक ६० मते पडल्याने त्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. तर सचिवपदाच्या निवडणुकीत ॲड. पी. ए. मडके यांनी ८३ मते घेत विजय संपादन केला. सहसचिवपदी ॲड.पी.ए.मडके, कोषाध्यक्षपदी ॲड.अमोल ढेंगळे व महिला प्रतिनिधी म्हणून ॲड.रोहिणी पवार यांची निवड करण्यात आली. ॲड.अण्णासाहेब सुतार यांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी सर्व विजयी उमेदवारांना पदभार देत निवडून आल्याबद्दलचे प्रमाणपत्र दिले. यावेळी उपस्थित वकील संघाच्या सर्व सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा व कार्यकारिणीचा सत्कार केला.

===Photopath===

010421\sakharam shinde_img-20210401-wa0006_14.jpg~010421\sakharam shinde_img-20210401-wa0004_14.jpg

===Caption===

गेवराई वकील संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. अमित मुळे यांची अध्यक्षपदी निवड झाली.

Web Title: Amit Mulen's hat trick as the president of Gevrai Bar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.