शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 7:54 PM

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले.

ठळक मुद्दे पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंडया व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात.या दिंडीतील वारकरी मागील सात वर्षांपासून अंबाजोागाई  येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात.

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई (बीड ) : शहरात आज योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. वेगवान अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या रिंगण सोहळ्याचा आनंद पावसाच्या सरींनी द्विगुणित केला. वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांची फुगडी खास आकर्षण ठरले. 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठु नामाचा गजर व टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंडया व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात. या दिंडीतील वारकरी मागील सात वर्षांपासून अंबाजोागाई  येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात. आज हिंगोली  जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, गंगाखेड संत जनाबाई, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील महमंद खान महाराज यांची पालखी तर अकोला येथील भाऊसागर माऊली यांची पालखी शहरात दाखल झाली. या दिंडयांना टाळ-मृंदगासह विठ्ठलनामाच्या गजरात योगेश्वरी मैदान ेयथे बँड पथक व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणण्यात आले. 

अश्व धावले रिंगणीयावेळी ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर मनोहरी रिंगण सोहळा पार पडला. हे दृश्य पाहून अश्व धावले रिंगणी अन् तुका झाला आकाशाएवढा अशी अनुभती अंबाजोगाईकरांनी अनुभवली. सोहळ्यात सजविलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष ठेवून घेत होते. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविलेल्या देखाव्याची भाविकांनी प्रशंसा केली. वारकऱ्यांच्या कुस्त्या, महिलांच्या फुगड्या व मैदानी खेळात भाविक तल्लीन झाले होते. 

यावेळी रिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा,  अध्यक्ष दिलीप सांगळे, कार्याध्यक्ष  बाबा महाराज जवळगावकर, उपाध्यक्ष दिलीप गित्ते, बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे,पंचायत समितीच्या सभापती मिना भताने, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, पं. उद्धवराव आपेगावकर, वैजनाथ देशमुख, बळीराम चोपने, अनंत आरसुडे, अभिजित जोंधळे, सुधाकर महाराज शिंदे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, मारूतीराव रेड्डी, बाळा पाथरकर, मुन्ना सोमाणी, योगेश कडबाने, दिग्विजय लोमटे यांनी पालखी प्रमुखांचे स्वागत केले. अश्व रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. हा रिंगण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीनेही चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भविकांना आनंदाने यात सहभागी होता आले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

या पालखी प्रमुखांचा झाला सन्मान अंबाजोगाईत रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने विदर्भासह मराठवाडयातील येणाऱ्या पालखी प्रमुखांचा सन्मान यावेळी स्वागत समितीच्या वतीने करण्यात आला.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष लोकेश चैतन्यस्वामी महाराज, सतीश विरळकर महाराज, आनंदराज महाराज हातला,  वासुदेव महाराज आकोट, काशीराम महाराज विरोडीकर, बाबा महाराज जवळगावकर, दादा महाराज दिग्रसकर, रामेश्वर महाराज शिंदे या मान्यवरांचा सन्मान अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात आला. 

दिंडया एकत्रीकरणासाठी प्रयत्नशीलविदर्भ, मराठवाडा व परिसरातून अंबाजोगाईमार्गे जवळपास २७४ दिंडया पंढरपूरकरडे जातात. छोट्या -मोठ्या दिंडयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आगामी काळात या छोट्या दिंडयांना एकत्रित करून या सर्व दिंडया नरसी नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या दिंडयासोंबत एकत्रित कशा जातील? यासाठी आपण अश्वरिंगण सोहळ्याचा स्वागताध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार असल्याचे नंदकिशोर मुंदडा म्हणाले. 

३०० वारकऱ्याची मोफत आरोग्य तपासणीपंढरपुर कडे वाटचाल करीत असलेल्या वारकरयाची मोफत आरोग्य तपासणी व औषधउपचार धनेश गोरे विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आली.स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर यांनी या कामी पुढाकार घेतला.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारीAmbajogaiअंबाजोगाईPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर