अंबाजोगाई न्यायालयातील चोरी; ३७ जणांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:33 IST2018-02-19T00:33:17+5:302018-02-19T00:33:31+5:30
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीला ११ दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात अपयश आल्याचे दिसते. आतापर्यंत ३७ लोकांची चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

अंबाजोगाई न्यायालयातील चोरी; ३७ जणांची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीला ११ दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात अपयश आल्याचे दिसते. आतापर्यंत ३७ लोकांची चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तीन न्यायालयातील मुद्देमाल असणाºया स्ट्राँग रूममध्ये खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यामध्ये जवळपास साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यातील योगेश्वरी देवीचे चोरी गेलेले सोने चोरट्यांकडून हस्तगत करून या रूममध्ये ठेवले होते. ते सोनेही चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर न्या. प्राची कुलकर्णी, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
तपासासाठी तात्काळ विशेष पथके नियूक्त केली. परंतु ११ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. चोरटे अद्यापही मोकाट असून शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरूच आहे.
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे व इतर अधिकारी कर्मचाºयांनी न्यायालयातील आजी, माजी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, काम करण्यासाठी येणारे कामगार व कुख्यात व सराईत गुन्हेगार अशा ३७ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु अद्याप मुख्य आरोपी मिळालेला नाही.