अमरसिंह पंडित, रजनी पाटील यांच्या नावांमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:40 IST2019-09-25T00:38:34+5:302019-09-25T00:40:10+5:30
राज्य शिखर बँक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ज्या ७० बड्या राजकीय नेत्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गेवराईचे राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील आणि अंबाजोगाईचे आनंदराव चव्हाण यांची नावे आहेत.

अमरसिंह पंडित, रजनी पाटील यांच्या नावांमुळे खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य शिखर बँक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ज्या ७० बड्या राजकीय नेत्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गेवराईचे राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील आणि अंबाजोगाईचे आनंदराव चव्हाण यांची नावे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
राज्य शिखर बँकेमध्ये २००५ ते२०१० च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप आणि इतर प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्र ारी उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलीस उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवारांसह सर्वच संचालकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती दरम्यान एकीकडे पोलीस तपास सुरू असताना सक्तवसुली संचालनालय या प्रकरणामध्ये लक्ष घातले असून राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात ईडी ने लक्ष घातल्यामुळे खळबळ उडाली आहे अजित पवारांपासून सुरू झालेले हे प्रकरण आणि त्याचे कनेक्शन थेट बीड पर्यंत असून २००९ ते १५ या दरम्यान शिखर बँकेचे संचालक असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित, शासकीय संचालक असणाऱ्या माजी खा. रजनी पाटील आणि त्यापूर्वी संचालक असलेले आनंदराव चव्हाण यांचेही गुन्हे दाखल झालेल्यांच्या यादीमध्ये नाव आहे. माजी आमदार पंडित यांचे नाव या प्रकरणांमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अमरसिंह पंडित यांचे बंधू बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे गेवराई मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत.
बीड जिल्ह्यातील राकाँचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या नेत्या माजी खासदार रजनी पाटील यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हे दाखल केल्याने जिल्ह्यास मोठा धक्का बसला आहे.