मुख्य रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:18+5:302021-07-20T04:23:18+5:30
रविवारी रात्री पाऊस, शेतीकामात व्यत्यय शिरूर कासार : पावसाने मध्यंतरी उघडीप दिल्याने शेतकामाला चांगला वेग आला होता, शेतशिवारात खुरपणी, ...

मुख्य रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी
रविवारी रात्री पाऊस, शेतीकामात व्यत्यय
शिरूर कासार : पावसाने मध्यंतरी उघडीप दिल्याने शेतकामाला चांगला वेग आला होता, शेतशिवारात खुरपणी, खत घालणे, फवारणी करणे सुरू होते; मात्र रविवारी पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि कामात मोठा व्यत्यय आला असल्याचे दिसून येत होते.
आषाढातही होऊ लागले लग्न
शिरूर कासार : पूर्वी आषाढ महिन्यात लग्न लावले जात नसायचे; परंतु कालपरत्वे आता आषाढातही लग्न लागू लागले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या महिन्यात बहुधा अन्य कामावर लक्ष दिले जात होते. पंढरपूरला अधिक तर लोक निवांत असल्याने जात होते; मात्र आता आषाढातही लग्न लावले जात असल्याचे दिसून येते.
आषाढी वारी घरच्या घरीच
शिरूर कासार : आज मंगळवारी महापर्वणी समजली जात असलेली आषाढी एकादशी असून, मोठी एकादशी लहान, मोठे सर्वजण उपवास करत असतात तर निष्ठावाण वारकरी पायी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय आदि संतांबरोबर पायी चालत पंढरपूरला जात असतात; मात्र यावर्षी ना वारी ना मंदिर उघडे, अशा स्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा घरच्या घरीच साजरा होणार असल्याने वारकऱ्यांना मात्र चुकल्यासारखे वाटत आहे.
पंधरा दिवसांपासून पंचायत समिती वाऱ्यावर
शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण आणि थेट गावपातळीवर निगडित असलेली पंचायत समिती पंधरा दिवसांपासून गट विकास अधिकारीच नसल्याने वाऱ्यावर आहे. तालुक्यात ५२ ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक कामे अवलंबून असतात. शिवाय शासकीय योजनादेखील राबवल्या जात असतात; मात्र साहेबच नसल्याने फायलींचा ढिगारा वाढत आहे, तसेच सरपंचसुद्धा अडचणीत सापडले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देऊन शिरूर पंचायत समितीला गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी महिला सरपंच संघटनेच्या दहीवंडीच्या सरपंच शीला आघाव यांनी केली आहे .