परळी पंचायत समितीतील भाजपचे तीनही सदस्य राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST2021-01-08T05:50:39+5:302021-01-08T05:50:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : परळी पंचायत समिती सभापतींविरुद्धच्या अविश्वास ठरवादरम्यान भारतीय जनता पक्षाचे तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ...

All three BJP members from Parli Panchayat Samiti are NCP members | परळी पंचायत समितीतील भाजपचे तीनही सदस्य राष्ट्रवादीत

परळी पंचायत समितीतील भाजपचे तीनही सदस्य राष्ट्रवादीत

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : परळी पंचायत समिती सभापतींविरुद्धच्या अविश्वास ठरवादरम्यान भारतीय जनता पक्षाचे तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने आता येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्यांची संख्या शून्य झाली आहे.

एकूण १२ सदस्य संख्या असलेल्या परळी पंचायत समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. गुरुवारी यावर मतदान झाले. मुळात १२ सदस्य असलेल्या परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे गटाचे ८ सदस्यांसह वर्चस्व आहे, त्यातच भाजपचे आणखी ३ सदस्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने आता पंचायत समितीच्या कार्यकारिणीत भाजपचे संख्याबळ शून्य झाले आहे. भाजपचा एक सदस्य आधीच अपात्र झाला आहे. दरम्यान, सभापतींवर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर नवीन सभापतींच्या निवडीसाठी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा आयोजित केली जाण्याची चिन्हे आहेत.

Web Title: All three BJP members from Parli Panchayat Samiti are NCP members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.