कोणाला विचारून कीर्तनाला आलीस, असे म्हणून पत्नीला पतीची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:08+5:302021-07-08T04:23:08+5:30

भूराज बदने यांच्या हातास फ्रॅक्चर झाले आहे परळी : कोणाला विचारून कीर्तनाला आलीस, असे म्हणून पत्नीला पतीने ...

Alice to kirtan by asking someone, so the wife beats her husband | कोणाला विचारून कीर्तनाला आलीस, असे म्हणून पत्नीला पतीची मारहाण

कोणाला विचारून कीर्तनाला आलीस, असे म्हणून पत्नीला पतीची मारहाण

भूराज बदने यांच्या हातास फ्रॅक्चर झाले आहे

परळी : कोणाला विचारून कीर्तनाला आलीस, असे म्हणून पत्नीला पतीने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. कीर्तन कार्यक्रम स्थळी तलवारीसारखे शस्त्र घेऊन आलेल्या गावातील त्या व्यक्तीस रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरपंच पतीस व अन्य एकासही मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी मालेवाडी येथील माणिक कुंडलिक बदने (रा मालेवाडी) याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . आरोपीस पोलिसांनी अटक करून शस्त्र जप्त केले आहे. परळीपासून सात किलोमीटर अंतरावरील मालेवाडी या गावात ६ जुलै रोजी दुपारी तीनच्या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. गावातील बरेच जण उपस्थित होते. या कार्यक्रमास एक महिला ही कीर्तन ऐकण्यासाठी बसलेली होती. तेव्हा तेथे त्यांचे पती माणिक बदने हे आले व तू कोणाला विचारून कीर्तनास आलीस, असे विचारून पत्नीस शिवीगाळ केली व दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुका मार दिला.

कीर्तनाच्या ठिकाणी कशाला शिवीगाळ करता, असे समजून सांगत असताना सुदाम आंधळे यांनाही दगडाने मारहाण करून दुखापत केली. मालेवाडी गावचे सरपंच पती भुराज बदने यांना तलवारी सारख्या शस्त्राने उजव्या हातास मारहाण करून जखमी केले. यात भूराज बदने यांचे हात फॅक्चर झाले असून, त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिचा पती माणिक कुंडलिक बदने याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सपोनी मारोतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज जीरगे हे तपास करीत आहेत.

070721\img-20210707-wa0338_14.jpg

Web Title: Alice to kirtan by asking someone, so the wife beats her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.