मद्यपी वाहनचालकांची उतरणार ‘नशा’!
By Admin | Updated: December 29, 2014 00:57 IST2014-12-29T00:34:41+5:302014-12-29T00:57:35+5:30
सोमनाथ खताळ , बीड ‘थर्टी फर्स्ट’चा ‘एन्जॉय’ करायचाच, असा संकल्प अनेकांनी केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘फुल्ल’ दारू प्यायची आणि वाहने चालवायची असे प्रकार घडतात.

मद्यपी वाहनचालकांची उतरणार ‘नशा’!
सोमनाथ खताळ , बीड
‘थर्टी फर्स्ट’चा ‘एन्जॉय’ करायचाच, असा संकल्प अनेकांनी केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘फुल्ल’ दारू प्यायची आणि वाहने चालवायची असे प्रकार घडतात. त्यामुळे अपघातही वाढतात तर अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडते. मात्र यावर उपाययोजना म्हणून बीड पोलीस दलाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून मद्यपी वाहनचालकांची ‘ब्रिथ अॅनलायझर’ मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे, या मोहिमेला सुरूवातही झाली आहे.
मावळत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचे, असे प्रत्येकाने नियोजन केले आहे. यामध्ये अनेकजन दारू पितात, तर काही सामाजिक उपक्रम राबवितात. मात्र मद्यपान करून ‘थर्टी फर्स्ट सेलीब्रेट’ करायचा. यामध्ये सुशिक्षीत व्यक्तींसह तरूणाईचा मोठा समावेश असतो. २० ते ३० वयोगटातील युवक असे प्रकार जास्तीत जास्त करीत असल्याचेही दिसून येते. मात्र मद्यपान करणे आणि त्यातली त्यात मद्यपान करून वाहन चालविणे हा गुन्हा असून सुद्धा आणि आपल्या जीवाला धोकादायक असतानाही अनेकजन असे प्रकार सर्रास करतात. त्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत.
मात्र यावर्षी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.
‘थर्टी फर्स्ट’च्चा ‘एन्जॉय’चा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी सांगितले.
चौका-चौकांत नाकाबंदी
शहर वाहतूक शाखेकडून चौकाचौकात नाकाबंदी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश घोडके यांनी सांगितले. यासाठी सगळी तयारी झाली असल्याचे सपोनि एम.ए.सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलातना सांगितले.
पोलीस रात्रभर गस्तीवर
४‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री अनेक तरूण दारू पिवून तर्रर्र झालेले असतात, अशातच ते वाहने चालवित असल्याने त्यांना व इतरांना याचा धोका पोहचण्याची दाट शक्यता असते, यावर नियंत्रण रहावे यासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात त्या ठाण्याच्या हद्दीत अधिकाऱ्यांसह कर्मचारी रस्त्यावर उतरून तपासणी करतील, असेही डोंगरे यांनी सांगितले.