शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"जाहीरनाम्यामध्ये सांगितले, पण एकाही भाषणात नाही"; कर्जमाफीवरुन अजितदादांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:23 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केलेल्या विधानावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

Ajit Pawar: राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरा, असं विधान केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्या या विधानावरुन टीका केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. घोषणांबाबत माझ्या भाषणात सांगितले नव्हते असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांवर भाष्य केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना अजित पवार यांनी केलेल्या विधानावरुन टीका होत असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचा विचार करु असंही अजित पवार म्हणाले.

"काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली. आपण लाडकी बहीण योजना चालू केली. त्यामध्ये आपण सध्या १५०० रुपये देतो. पण ज्यावेळी आपली परिस्थिती काळानुरुप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण करु. मी ३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितले. तर त्याच्यावरुन टीका केली. जाहीरनाम्यामध्ये जरुर सांगितले होते पण माझ्या एकाही भाषणात मी सांगितले नव्हते. माझी भाषणं काढून बघा. कारण मी त्याचा उल्लेख केला की सगळी सोंग  करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. विरोधक म्हणतात तुम्हाला घोषणा करताना आठवलं नाही का. अशी टीका होणार पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. ते नियोजन बिघडता कामा नये," असं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?

"लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे ४५ हजार कोटींचा बोजा सरकारने पेलला असताना कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा. काहींनी निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. जे सांगितले, ते प्रत्यक्षात येत नाही. शेतकऱ्यांना माझे सांगणे आहे, की ३१ तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा," असं आवाहन अजित पवारांनी केले होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाFarmerशेतकरीBeedबीड