कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:15+5:302021-04-10T04:33:15+5:30

येथील बाजार समिती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तूर, बाजरी,गहु ,ज्वारी, हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरित पिकांना ...

The Agricultural Produce Market Committee should procure fruits along with vegetables | कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी

येथील बाजार समिती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तूर, बाजरी,गहु ,ज्वारी, हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरित पिकांना खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मेथी, चुका, पालक, गोबी, वांगे, कांदे, लसून, कोथींबीर, भेंडी, गवार, कारले, दोडके व टरबूज पपई, मोसंबी, लिंबू, खरबूज आदि फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीत भाजीपाला व फळे खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून तो आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यातुन अनेक शेतकऱ्यानी भाजीपाला - फळबागा या शहरात नेऊन खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करने तोट्याचे अडचणीचे होत असल्याने व सध्या वारंवार होणाऱ्या लॉकडाऊन मुळे आवश्यक वाहतुक उपलब्ध नसल्यामुळे भाजीपाला व फळे बागेतच पडून राहिले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील निघत नसल्याने अनेक खाजगी सावकारांचे उतरवठे झिजवत आहेत. तर काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत . परंतु शासनाचे प्रतिनिधी असनारे पालकमंत्री, आमदार, खासदार व बाजार समितीतील पदाधीकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवत आहेत .

माजलगाव बाजार समितीने शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ निर्माण करुन तात्काळ खरेदी व विक्री करुन शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या भाजीपाला व फळांची जबाबदारीने व हमीभावात तात्काळ खरेदी सुरु करावी. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतिने ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जंयती दिवशी सकाळी ११ वाजता बाजार समितीचे आवारात भाजीपाला व फळे यांचे बाजार समितीस तोरण बांधुन राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती करुन आसुड आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील, लहु सोळंके, राजाभाउ घायतिडक, मुंजा पांचाळ, समाधान पोळ, सिद्धेश्वर गायकवाड, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, राजेभाऊ जाधव, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, यांच्यासह आदींनी केले आहे.

Web Title: The Agricultural Produce Market Committee should procure fruits along with vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.