शेती सिंचन अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST2021-06-06T04:24:55+5:302021-06-06T04:24:55+5:30
सूचनांचे पालन गरजेचे बीड : पहिल्या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याने कोरोनावर मात करता आली. आता नव्याने पुन्हा नव्याने हे आव्हान ...

शेती सिंचन अडचणीत
सूचनांचे पालन गरजेचे
बीड : पहिल्या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याने कोरोनावर मात करता आली. आता नव्याने पुन्हा नव्याने हे आव्हान समोर येत असून, यासाठी मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. परंतु नागरिकांमध्ये याबाबत जागृती अद्यापही दिसेनाशी झाली आहे.
गॅसचा गैरवापर
बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते.
पुलांचे कठडे गायब
बीड : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
इंटरनेट विस्कळीत
बीड : मागील काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.