कृषी संस्कृती सर्वश्रेष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:06+5:302021-04-05T04:30:06+5:30
: रासेयोच्या विशेष शिबिराचा समारोप अंबाजोगाई : इतर संस्कृतीपेक्षा कृषिसंस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वतःपेक्षा ...

कृषी संस्कृती सर्वश्रेष्ठ
: रासेयोच्या विशेष शिबिराचा समारोप
अंबाजोगाई : इतर संस्कृतीपेक्षा कृषिसंस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वतःपेक्षा सहकाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. कृषी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर असून, वनराईने नटलेला दिसत आहे. हे परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मानबिंदू असेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक पं. उद्धव आपेगावकर यांनी केले.
येथील कृषी महाविद्यालयांतर्गत रासेयोच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषदेचे सदस्य राहुल सोनवणे उपस्थित होते. मोरेवाडीचे माजी सरपंच वसंतराव मोरे, अंबा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमान मोरे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, कविराज कचरे, राहुल मोरे, डॉ. संजय मोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी राहुल सोनवणे म्हणाले, प्रामाणिकपणा, शिस्त व कठोर परिश्रमातून प्राप्त झालेले यश हे शाश्वत होय. कृषीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचे कार्य करावे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असावे.
प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही चळवळ असून, यातूनच भविष्याचा आदर्श नागरिक घडू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व व कार्यसंस्कृती जोपासावी. जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांनी सादर प्रास्ताविक केले. राजेश रेवले यांनी सूत्रसंचालन केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बसवलिंगआप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. अरुण कदम, डॉ. दीपक लोखंडे, डॉ. सुहास जाधव, प्रा. सुनील गलांडे, डॉ. नरेंद्र कांबळे, डाॅ. विद्या तायडे, डॉ. योगेश वाघमारे, अनंत मुंढे, सुनील गिरी, यादव पाटील, सय्यद इरफान, स्वप्निल शिल्लार, पूजा वावरगीरे, भास्कर देशपांडे, प्रकाश मुजमुले व नंदकिशोर मोरे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
040421\img-20210401-wa0104_14.jpg