सोनहिवऱ्यात अग्नीतांडव; २० गंजींचा कोळसा
By Admin | Updated: February 8, 2015 00:12 IST2015-02-07T23:50:43+5:302015-02-08T00:12:18+5:30
परळी : तालुक्यातील सोनहिवरा गावालगत असणाऱ्या कडब्याच्या गंजीस अचानक आग लागली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच

सोनहिवऱ्यात अग्नीतांडव; २० गंजींचा कोळसा
परळी : तालुक्यातील सोनहिवरा गावालगत असणाऱ्या कडब्याच्या गंजीस अचानक आग लागली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अग्नीशामक दलाला बोलाविले. सकाळी ९ पर्यंत आग विझविण्याचे काम चालू होते.
सोनहिवरानजीक असणाऱ्या शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावून ठेवलेल्या आहेत. शनिवारी पहाटे अचानक गंजीला आग लागली. अग्नीशामक दलाचा बंब पोहोचला परंतु तोपर्यंत सारे संपले होते. या आगीत वीस शेतकऱ्यांची कडब्यासह शेतीची औजारे जळाली तर पाच महिन्याचे वासरू पन्नास टक्के भाजले. आग वेळीच आटोक्यात आणली गेली नसती तर अख्ख्या गावाला आगीने वेढा घातला असता असे सोनीहिवरा गावचे दिलीप मुंडे, राहूल मुंडे यांनी सांगितले. शनिवारी दुपारी जि.प.चे माजी सदस्य संजय दौंड यांनी गावाला भेट दिली. मंडल अधिकारी अर्जुन केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. (वार्ताहर)