ओबीसींच्या आंदोलनाने परळी दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:59+5:302021-06-27T04:21:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवारी सकाळी १० ते १२.३० वाजेदरम्यान येथील छत्रपती संभाजी ...

ओबीसींच्या आंदोलनाने परळी दणाणले
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवारी सकाळी १० ते १२.३० वाजेदरम्यान येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करू निषेध केला. दरम्यान, परळी-बीड मार्गावर अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती.
खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह फुलचंद कराड, मारोती मुंडेगुरुजी, जयश्री गीते, डॉ. शालिनी कराड, नीळकंठ चाटे, रमेश गायकवाड, श्रीराम मुंडे, प्रा. पवन मुंडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाले. त्यानंतर साडेबाराच्यासुमारास पोलिसांनी खासदार मुंडे यांच्या सह ५० भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहनात बसवून परळी शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथून त्यांना सोडून देण्यात आले.
अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, अशोक खरात, मोहन जाधव व इतर पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनात दत्ताअप्पा ईटके, विकास डुबे, अरुण टाक, शांतिलाल जैन, केशव माळी, जुगलकिशोर लोहिया, वैजनाथ जगतकर, सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे, जिवराज ढाकणे, ज्ञानदेव तांदळे, दिलीप बिडगर, राजेश गित्ते, अजय गित्ते, किशोर गित्ते, राजेंद्र ओझा, विजय मुंडे, राहुल टाक, दत्ता देशमुख, अश्विन मोगरकर, योगेश पांडकर, अरुण पाठक, गणेश होलंबे, नरेश पिंपळे, सुचिता पोखरकर. वर्षा पिंपळे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
===Photopath===
260621\img20210626120002_14.jpg~260621\img-20210626-wa0502_14.jpg~260621\img-20210626-wa0501_14.jpg