पुन्हा दोघांचा बळी, नवे १७ रुग्ण तर २९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST2021-01-02T04:27:10+5:302021-01-02T04:27:10+5:30

शुक्रवारी दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात चिखलबीड (ता. वडवणी) येथील ४० वर्षीय पुरुष व परळीतील गणेशपार येथील ...

Again, two victims, 17 new patients and 29 corona-free | पुन्हा दोघांचा बळी, नवे १७ रुग्ण तर २९ कोरोनामुक्त

पुन्हा दोघांचा बळी, नवे १७ रुग्ण तर २९ कोरोनामुक्त

शुक्रवारी दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात चिखलबीड (ता. वडवणी) येथील ४० वर्षीय पुरुष व परळीतील गणेशपार येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात ४६७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ४५० जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर केवळ १७ नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई व परळी तालुक्यात प्रत्येकी २, आष्टी, माजलगाव, केज व पाटोदा या चार तालुक्यात प्रत्येकी १ तर बीड तालुक्यात ६ व गेवराई तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.

आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ८०० इतकी झाली असून, यापैकी १५ हजार ९९० जणांनी कोरोनावर मात केली असून ५३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता २७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Web Title: Again, two victims, 17 new patients and 29 corona-free