पुन्हा सहा मृत्यू; ३९३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:48+5:302021-04-02T04:35:48+5:30
बीड जिल्ह्यात टाळेबंदी असतानाही बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात २ हजार ९५६ ...

पुन्हा सहा मृत्यू; ३९३ नवे रुग्ण
बीड जिल्ह्यात टाळेबंदी असतानाही बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात २ हजार ९५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यामध्ये ३९३ नवे रुग्ण आढळून आले तर २ हजार ५६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १२७, अंबाजोगाई ६५, आष्टी ४५, धारूर ४, गेवराई ११, केज ३३, माजलगाव ३४, परळी ३४, पाटोदा २६, शिरूर ५ तर वडवणी तालुक्यातील ९ जणांचा समावेश आहे. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात अजमेरनगर, बीड येथील ७७ वर्षीय पुरुष व इंद्रप्रस्थनगर, बीड येथील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय पूर्वीच्या चार मृत्यूंची नोंद गुरुवारी आरोग्य विभागाकडे झाली.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५ हजार ८९७ इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २३ हजार ५०२ इतकी आहे. तसेच ६४१ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.