पुन्हा २९४ नवे रूग्ण, १५१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:32 IST2021-03-20T04:32:19+5:302021-03-20T04:32:19+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी १९११ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ८९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २९४ बाधित रुग्ण निष्पन्न ...

पुन्हा २९४ नवे रूग्ण, १५१ कोरोनामुक्त
जिल्ह्यात शुक्रवारी १९११ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ८९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २९४ बाधित रुग्ण निष्पन्न झाले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ११७, अंबाजोगाई ५८, आष्टी ३३, धारूर ७, गेवराई १४, केज १०, माजलगाव २६, परळी २२, पाटोदा १, शिरूर ४ व वडवणी तालुक्यातील २ रूग्णांचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २१ हजार ७५२ इतका झाला आहे. पैकी १९ हजार ९९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ५९८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.