एक वर्षानंतर शक्तिकुंज वसाहतीत रंगली काव्य मैफल - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:08+5:302021-02-05T08:24:08+5:30
कोरोना प्रादुर्भावामुळे एक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ बसली होती. त्यामुळे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष केशव कुकडे उर्फ ...

एक वर्षानंतर शक्तिकुंज वसाहतीत रंगली काव्य मैफल - A
कोरोना प्रादुर्भावामुळे एक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ बसली होती. त्यामुळे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष केशव कुकडे उर्फ मुक्तविहारी व अश्वमेध नाट्य संघाचे व्यवस्थापक दिनेश कदम यांच्यातर्फे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याकडे या कार्यक्रमाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. आव्हाड व सहायक कल्याण अधिकारी अविनाश जाधव यांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन सहकार्य केले.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा कवी विश्वंभर वराट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड, उपमुख्य अभियंता एच.के. अवचार आणि अधीक्षक अभियंता एस.पी. राठोड हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कवयित्री प्रियदर्शनी गुणाले आणि प्रसिद्ध कवी तथा शाहीर अनंत मुंडे यांनी केले. त्यांनी सादर केलेल्या चारोळ्या व बहारदार सूत्र संचालनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. यावेळी विश्वंभर वराट, प्रमोद जाधव, डॉ. राजकुमार यल्लावाड, अनंत मुंडे, संजय आघाव, बालाजी कांबळे, सिद्धेश्वर इंगोले, लक्ष्मण लाड, रानबा गायकवाड, गजानन साबळे, कवी मुक्तविहारी, देवराव चामनर, संदीप पाटील, प्रियदर्शिनी गुणाले, दिवाकर जोशी, सूचित मुंडे, आदिनाथ नागरगोजे, यशोधन अवचार, दशरथ उपाडे, मनोज सूर्यवंशी आणि महेश होनमाने आदींनी कवितांचे सादरीकरण केले.
औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता एच.के. अवचार यांनी उत्स्फूर्तपणे दोन कवितांचे सादरीकरण केले. काव्य मैफिलीसाठी मोहन आव्हाड, एच.के. अवचार, अविनाश जाधव, डी.जी. इंगळे, सी.आर. होळंबे, एस. एम. नरवाड, एस.पी. राठोड, राजेश बेंद्रे, वैजनाथ तेलंग आणि अश्वमेध नाट्य संघामधील कलाकारांनी सहकार्य केले.