पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:07+5:302021-07-12T04:22:07+5:30
पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांना सोमवारपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे दिले आश्वासन पाचवा दिवस : पोलीस उपअधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविणार ...

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे
पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांना सोमवारपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे दिले आश्वासन
पाचवा दिवस : पोलीस उपअधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांना सोमवारपासून सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल. पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी अहवालानुसार त्यांची इतरत्र बदली केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ. संजय दौड यांच्या माध्यमातून दिले. यानंतर रविवारी रात्री पाचव्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. निरपराध नागरिकाला बेदम मारहाण करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हे आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन पाच दिवस सुरू होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी अंबाजोगाईला येऊन घटनेची माहिती जाणून घेतली होती. दरम्यान रविवारी पालकमंत्री मुंडे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले, असे आंदोलनाचे समन्वयक ॲड. माधव जाधव यांनी सांगितले.
रविवारी आमदार विनायक मेटे, शेकापचे मोहन गुंड, राहुल सोनवणे, ॲड. इस्माईल गवळी, शेख वजीर, अशोक ठाकरे, दत्तात्रय मोरे, अमित घाडगे, अनंत पिंगळे, ॲड. शरद लोमटे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांनी भेटी देऊन पाठिंबा दिला होता.
...
काय होते प्रकरण..
अंबाजोगाई येथील संगणक व्यावसायिक विलास यादव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मागील पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. विलास यादव यांचे चुलतभाऊ यांच्यावर विनयभंग आणि ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल असल्याने ते फरार आहेत. त्यांचा शोध घेण्याच्या नावाखाली पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना वेठीस धरले. विलास यादव यांना स्वतः डीवायएसपी जायभाये यांनी चौकशीच्या निमित्ताने जातीवाचक भाषा वापरून बेदम मारहाण केली होती.
....
घाटनांदूर येथे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
दरम्यान, यादव मारहाण प्रकरणी घाटनांदूर येथे रविवारी मराठा समाज बांधवांनी पोलीस उपअधीक्षक जायभाये यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर होळ येथील कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून निलंबनाची मागणी केली.
110721\fb_img_1626011088752.jpg
आंदोलनाची सांगता झाली.या वेळी आ.संजय दौड यांनी