आष्टी, पाटोदा, गेवराईनंतर आता शिरूर तालुक्यात कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:23+5:302021-07-21T04:23:23+5:30
बीड : जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर आत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने शिरूर ...

आष्टी, पाटोदा, गेवराईनंतर आता शिरूर तालुक्यात कडक निर्बंध
बीड : जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर आत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने शिरूर कासार तालुक्यात सोमवार ते शुक्रवारी आवश्यक सेवेव्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवांच्या पुरवठा संबंधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. दुपारी एक वाजेनंतर केवळ अत्यावश्क कारणांव्यतिरिक्त (परगावी प्रवास, वैद्यकीय सेवा) हालचाल व शहरांतर्गत अथवा गावांतर्गत प्रवासास परवानगी असणार नाही. कोरोना नियम तसेच उक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत. शिरूर तालुक्यात हे आदेश २२ ते २८ जुलै या कालावधीत लागू राहतील.