बीड जिल्हा बँकेवर प्रशासकाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST2021-02-24T04:34:39+5:302021-02-24T04:34:39+5:30

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीत सेवा सहकारी मतदार संघाच्या ११ जागांसाठी एकही उमेदवार पात्र ...

Administrator's cloud over Beed District Bank | बीड जिल्हा बँकेवर प्रशासकाचे ढग

बीड जिल्हा बँकेवर प्रशासकाचे ढग

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीत सेवा सहकारी मतदार संघाच्या ११ जागांसाठी एकही उमेदवार पात्र न ठरल्याने बँकेवर प्रशासकाचे ढग निर्माण झाले आहेत. दरम्यान, छाननी व सुनावणीची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती. राखीव अर्ज ठेवलेले संबंधित उमेदवार त्यांची आवश्यक कागदपत्रे दिलेल्या अवधीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करत होते.

जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी २१४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सेवा सोसायटी मतदार संघातून ८७ अर्ज दाखल झाले होते. जिल्हा बँकेच्या उपविधीतील नियमानुसार जी सेवा संस्था लेखापरीक्षणात अ किंवा ब वर्गातील आहे, त्या सेवा संस्थेचा प्रतिनिधी ही निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरू शकतो; मात्र जिल्ह्यात ७३५ सेवा संस्थांपैकी केवळ १३ सेवा संस्था लेखा परिक्षणाच्या अ किंवा ब वर्गात आहेत. जिल्हा बँकेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रथमच सेवा संस्था मतदारसंघात एकही अर्ज पात्र ठरला नाही. सर्वच उमेदवारांच्या संस्था या ऑडिट क व ड वर्गातील असल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत.

अपात्र उमेदवार कायदेशीर दाद मागण्याच्या तयारीत

ज्याचे अर्ज अपात्र ठरले, त्यापैकी बहुतांश उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या नाराजीने विभागीय सहकार निबंधकांकडे कायदेशीर दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे समजते. न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात ते जाऊ शकतात. इतर काही ठिकाणी लेखा परीक्षणाबाबतच्या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचा मुद्दा पुढे येऊ शकतो.

---------

दिगग्जांसह सर्वांचे अर्ज अपात्र

सेवा सोसायटी मतदार संघातून सर्वच तालुक्यातील विजयसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, अलका नरवडे, अर्जुन तिडके, ज्ञानोबा चोले, महेंद्र गर्जे, सत्यभामा बांगर, पांडुरंग मस्के, पांडुरंग सानप, जयदत्त धस, सतीश शिंदे, रोहिदास झांबरे, अशोक लोढा, राजेंद्र मस्के, चंद्रसेन घोडके, वसंतराव सानप, जीवन जोगदंड, चंद्रकला वनवे, रमेश आडसकर, बजरंग सोनवणे, ऋषिकेश देशमुख, फुलचंद मंडे, जीवराज ढाकणे, रमाकांत मुंडे, अभय मुंडे, दत्ता पाटील या दिग्गजांसह सर्वच उमेदवारांचे अर्ज केवळ लेखा परीक्षणाच्या मुद्दयावर अपात्र ठरले आहेत.

---------

===Photopath===

230221\23bed_16_23022021_14.jpg

===Caption===

बीड जिल्हा बँक

Web Title: Administrator's cloud over Beed District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.