शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात १८ गावांच्या ग्रामसेवक, सरपंचावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 15:41 IST

१८ गावांच्या सरपंचांना प्रत्येकी एक हजार रुपए दंडाची शास्ती

ठळक मुद्दे१६ ग्रामसेवकांच्या वेतनवाढी कायम बंद१८ ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीचेही आदेश

बीड : जिल्ह्यातील आष्टी येथील पंचायत समिती अंतर्गत मनरेगाच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मोठी कारवाई करत १६ ग्रामसेवकांच्या वार्षिक वेतनवाढी  कायमस्वरुपी बंद केल्या.  १८ ग्रामरोजगार सेवकांची सेवा समाप्त करण्यात आली असून नवे ग्रामरोजगार सेवक नियुक्तीबाबत ग्रामपंचायतींना आदेशित करण्यात आले. तसेच १८ सरपंचांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शास्ती करण्यात आली आहे. 

आष्टी पं. सं. अंतर्गत मनरेगा कामातील गैरव्यवहारप्रकरणी तक्रार आल्यानंतर १४ मे रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) दत्तात्रय गिरी आणि लेखा अधिकारी आव्हाड यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाची प्रत्यक्ष गावात व कामाच्या ठिकाणी ८ स्वतंत्र पथके नेमून चौकशी केली. ३९ ग्रामपंचायतमधील कामांच्या तक्रारी होत्या. गावात काही मयत, पेन्शनर, वयोवृद्ध, नोकरदार, दिव्यांग, स्थलांतरीत अशा काही मजुरांच्या नावे मजुरीची रक्कम अदा केल्याचे निदर्शनास आले. तसेच या गावात चुकीचे जॉबकार्ड नोंदणी केल्याचे व काही चुकीचे मजूर दर्शवून काम मागणी नोंदवल्याचे तसेच बोगस नावांवर रक्कम अदा केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून सीईओंनी ही जम्बो कारवाई केली.

बीडीओची विभागीय चौकशीतत्कालीन गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना विभागीय चौकशी करण्याबाबतची नोटीस दिली आहे. पंचायत समिती स्तरावरील डेटा इन्ट्री आॅपरेटर पाखरे याचीदेखील सेवा समाप्त करण्यात आली.एकूण ३९ ग्रामपंचायतमधील कामांची तक्रार होती. 

या सरपंचांना प्रत्येकी हजार रूपयांचा दंडबाबासाहेब शेकडे (म्हसोबावाडी), संगिता सरपते (शेडाळा), कृष्णा शेकडे (गौखेल), कांताबाई पानसाडे (ब्रम्हगाव), कांतीलाल गटकळ (वाघळूज), छाया माळी ( पिंपळगाव घाट), रोजंद्र म्हस्के (सावरगाव), पारुबाई झरेकर ( मोराळा), शिवाजी मगर (बांधखेल), रंजना सुर्यवंशी (नागतळा), सखुबाई गायकवाड (बेलतुरी), आदिनाथ विधाते (नांदूर), सुमन कवडे (पिंपळगाव दाणी), गयाबाई मुरुमकर (कोयाळ), मनिषा चव्हाण( डोंगरगण), शेभा गर्जे (पाटसरा), आसराबाई केन्द्रे (वंजारवाडी),बबन तळेकर (देवळाली)

या ग्रामसेवकांच्या वार्षिक वेतनवाढ कायम बंदगौखेल येथील सय्यद शकील जमादार, उषा म्हेत्रे (वाघळूज), दादासाहेब वाणी (पिंपळगाव घाट, सावरगाव घाट), उद्धव शिंदे (नांदूर), प्रवीण बवार (शेडाळा), नितीन गायकवाड (नागतळा), संजय नेयके (ब्रह्मगाव), बलभीम परकाळे (बांधखेल), सोनाली साखरे (म्हसोबाची वाडी, बेलतुरी), अनिल सानप (मोराळा) या ग्रामसेवकांच्या दोन वार्षिक वेतनवाढी कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या. तर गोवर्धन गिरी (वंजारवाडी), दत्तात्रय घोडके (डोंगरगण), विष्णू बांगर (पाटसरा), धुळाजी आजबे( देवळाली), अशोक आडसूळ (कोयाळ), आनंद शिंदे (पिंपळगाव दाणी) यांच्या एक वार्षिक वेतनवाढ कायम बंद करण्यात आली.

१८ ग्रामरोजगार सेवकांची सेवा समाप्तनानासाहेब खराडे (पिंपळगाव दाणी), साधू मुरुमकर (कोयाळ), विठ्ठल मिसाळ (डोंगरगण), अंकुश गर्जे (पाटसरा), उद्धव बेद्रे (वंजारवाडी), विठ्ठल तांदळे (देवळाली), सुरेश शेकडे (म्हसोबावाडी), शेख जावेद (शेडाळा), सोपान आहेरकर (गौखेल), बाबासाहेब देशमुख (ब्रम्हगाव), ज्ञानदेव मोहिते (वाघळूज), वैभव दुधलमल (पिंपळगाव घाट), दत्तात्रय मस्के (सावरगाव), संजय वनवे( मोराळा/ नागतळा), शिवाजी थोरात (बांधखेल), पांडुरंग धन्वे (वेलतुरी), सूर्यभान विधाते (नांदूर)

टॅग्स :Beedबीडfraudधोकेबाजीsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत