अवैध दारू विक्रीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST2021-04-04T04:35:29+5:302021-04-04T04:35:29+5:30
केज : अवैधरीत्या चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या एका इसमास केज पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून देशी दारू जप्त केली. ...

अवैध दारू विक्रीवर कारवाई
केज : अवैधरीत्या चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या एका इसमास केज पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून देशी दारू जप्त केली. शनिवारी पेट्रोलिंग करताना गुप्त बातमीदारामार्फत पिसेगाव फाट्याजवळ लक्ष्मण विलास काळे (रा. पिसेगाव फाटा, ता. केज) हा विनापरवाना बेकायदेशीरपणे देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो. नि. प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संतोष मिसळे, स. फौ. महादेव गुजर, धनपाल लोखंडे, गुन्हे शाखेचे बाळासाहेब अहंकारे आणि दिलीप गित्ते यांनी दोन पंचासमक्ष सकाळी ११ वाजता अचानक छापा मारून लक्ष्मण विलास काळे याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळनेर परिसरात चंदनचोरी वाढली
बीड : पिंपळनेर परिसरात चंदनचोर सक्रिय असून पोलिसांत तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे फावले आहे. दोन दिवसांपूर्वी बाबासाहेब विठ्ठल पतंगे यांच्या शेतातून चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले होते. त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा पाच झाडे चोरट्यांनी चोरून नेली. चंदन चोरांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी परिसरातून होत आहे.