पाच दिवसांनंतरही खुनातील आरोपी फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST2021-09-16T04:42:08+5:302021-09-16T04:42:08+5:30

माजलगाव : तालुक्यातील राजेगावजवळ असलेल्या होना नाईक तांडा येथील विवाहितेला सासरच्या मंडळींनी मारहाण करून जीवे मारल्याची घटना शुक्रवारी रोजी ...

The accused is still absconding after five days | पाच दिवसांनंतरही खुनातील आरोपी फरारच

पाच दिवसांनंतरही खुनातील आरोपी फरारच

माजलगाव : तालुक्यातील राजेगावजवळ असलेल्या होना नाईक तांडा येथील विवाहितेला सासरच्या मंडळींनी मारहाण करून जीवे मारल्याची घटना शुक्रवारी रोजी घडली होती. या घटनेला पाच दिवस उलटूनही यातील आरोपींना पोलीस अटक करू शकले नाहीत.

तालुक्यातील राजेगावजवळ असलेल्या नाईक तांडा येथील विवाहित महिला मीना संतोष राठोड हीस शुक्रवारी जीवे मारले होते. तिचा खून केलेला असतानाही खुनाचा गुन्हा दाखल करण्यास ग्रामीण पोलीस टाळाटाळ करीत असल्याने मीनाच्या माहेरकडील मंडळींनी पोलीस ठाण्यासमोर सात तास ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी मीनाची सासू पारूबाई प्रभाकर राठोड, दिर विलास प्रभाकर राठोड, जाऊ कविता विलास राठोड व नणंदेचा पती बाळू शंकर पवार यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल ३०तासांनंतर मीनावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

या घटनेला पाच दिवस उलटले असतानाही यातील एकाही आरोपीला पोलीस अटक करू शकले नाहीत. यामुळे मीनाच्या नातेवाईकांत पोलिसांविषयी नाराजी आहे.

-----

खुनातील आरोपींना पकडण्यासाठी आम्ही पथक नेमले आहे. आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल.

-निलेश इधाते, सहायक पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे.

Web Title: The accused is still absconding after five days