बहिणीचा खून करणारे आरोपी फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:36 IST2021-04-23T04:36:32+5:302021-04-23T04:36:32+5:30

तालुक्यातील बोरगाव येथे आईला पुणे येथून पाडव्याच्या सणानिमित्त शीतल लक्ष्मण चौधरी (वय २८) या त्यांच्या अकरा वर्षीय मुलीसह ...

Accused of killing sister absconding | बहिणीचा खून करणारे आरोपी फरारच

बहिणीचा खून करणारे आरोपी फरारच

तालुक्यातील बोरगाव येथे आईला पुणे येथून पाडव्याच्या सणानिमित्त शीतल लक्ष्मण चौधरी (वय २८) या त्यांच्या अकरा वर्षीय मुलीसह भेटण्यास आल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास शीतल चौधरी यांचा भाऊ दिनकर ऊर्फ दिनू गोरख गव्हाणे याने व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोघांनी अज्ञात कारणावरून शीतल यांच्या डोक्यात हत्याराने वार करून खून करून पोबारा केला. या प्रकरणी चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत दिनकर व त्याचा मित्र दिगंबर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस आरोपीच्या शोधात असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.

Web Title: Accused of killing sister absconding