लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:00 PM2019-03-07T16:00:03+5:302019-03-07T16:00:27+5:30

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

accused arrested who raped minor girl by giving marriage promise | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

Next

अंबाजोगाई (बीड ) : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मागील सहा महिन्यांपासून तिच्यावर सतत अत्याचार केल्याची घटना  तालुक्यातील चोपनवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनीअटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

तालुक्यातील चोपनवाडी येथील सोळा वर्षीय मुलगी दिंडीत गेली असताना घाटनांदूर येथील नागेश उत्तम आपटे या तरुणासोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून नागेशने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार दुचाकीवरून आणि कारमधून चोपनवाडी शिवार, उजनी शिवार, घाटनांदूर शिवार आणि स्वतःच्या शेतात, परळी-नंदागौळ रस्त्यालगत नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. याकामी नागेशला त्याच्या सोमेश्वर आणि गणेश (दोघेही रा. घाटनांदूर) या दोन मित्रांनी सहकार्य केले असेही पिडीतेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात नागेश आपटे, सोमेश्वर आणि गणेश या तिघांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी नागेशला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.

Web Title: accused arrested who raped minor girl by giving marriage promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.