भावाला राखी बांधून परतणाऱ्या बहिणीचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST2021-08-24T04:38:13+5:302021-08-24T04:38:13+5:30

सुनीता अशोक भावले (वय २५, रा. भावले वस्ती, ता. गेवराई) असे मृत्यू झालेल्या बहिणीचे नाव आहे. रविवारी रक्षाबंधन असल्याने ...

Accidental death of a sister who was returning after tying rakhi to her brother | भावाला राखी बांधून परतणाऱ्या बहिणीचा अपघाती मृत्यू

भावाला राखी बांधून परतणाऱ्या बहिणीचा अपघाती मृत्यू

सुनीता अशोक भावले (वय २५, रा. भावले वस्ती, ता. गेवराई) असे मृत्यू झालेल्या बहिणीचे नाव आहे. रविवारी रक्षाबंधन असल्याने सुनीता या पती अशोक भावले आणि दोन मुलांसह माहेरी बागपिंपळगाव येथे भावांना राखी बांधण्यास गेल्या होत्या. दुपारनंतर दुचाकीवरून आपल्या पती आणि दोन मुलांसह गावाकडे परत निघाल्या. वस्तीजवळ खड्डा चुकवताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने पाठीमागे बसलेल्या सुनीता भावले खाली पडल्या. त्यांना गंभीर मार लागल्याने जागीच बेशुद्ध झाल्या. त्यांना तत्काळ उपचारास नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी रक्षाबंधन उरकून परत येणाऱ्या बहिणीचा मृत्यू भावांना धक्कादायक ठरला आहे. सुनीता भावले यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासु, सासरे असा परिवार आहे.

Web Title: Accidental death of a sister who was returning after tying rakhi to her brother