मुलीचा अपघाती मृत्यू, पित्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST2021-09-03T04:35:59+5:302021-09-03T04:35:59+5:30

निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने मुलगी सिमेंट रस्त्यावर खाली पडून गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ...

Accidental death of daughter, crime against father | मुलीचा अपघाती मृत्यू, पित्याविरुद्ध गुन्हा

मुलीचा अपघाती मृत्यू, पित्याविरुद्ध गुन्हा

निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने मुलगी सिमेंट रस्त्यावर खाली पडून गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. जावयाच्या फिर्यादीवरून सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला.

चंद्रकांत रघुनाथ कांबळे ( वय४८, रा. पूस) हे मुलगी सुकुमार लक्ष्मण पवार ( ३०) व नातवासह ढोकी ( जि. उस्मानाबाद) येथून मोटारसायकलवरून घेऊन येत होते. सायगाव येथे आल्यानंतर गतिरोधकाकडे दुर्लक्ष करून मोटरसायकल भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवली. यामुळे मोटारसायकलवर बसलेली मुलगी सुकुमार ही खाली पडून गंभीर जखमी झाली. सोलापूर येथे उपचारादरम्यान ती मयत झाली. लक्ष्मण रमेश पवार यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत कांबळे यांच्या विरुद्ध बर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Accidental death of daughter, crime against father