नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:43+5:302021-03-06T04:31:43+5:30

बीड : तालुक्यातील मांजरसुंबा घाटात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चेन्नईवरून दिल्लीकडे नारळ घेऊन नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या अपघातानंतर ...

Accident to a truck carrying coconuts | नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात

नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात

बीड : तालुक्यातील मांजरसुंबा घाटात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चेन्नईवरून दिल्लीकडे नारळ घेऊन नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र नारळ पसरले होते. परिसरातील काही नागरिकांनी त्या ट्रकचालकास मदत केली, तर रस्त्यातून जाणाऱ्या काही वाहनधाराकांनी नारळ लुटण्यावर भर दिल्याचे चित्र होते.

मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरू असून, शुक्रवारी पाहटेच्या दरम्यान चेन्नईवरून नारळ घेऊन जाणारा ट्रक मांजरसुंबा घाटात अपघात झाला. यावेळी पाठीमागून आलेले दोन ट्रकदेखील त्या ट्रकला पाठीमागून धडकले. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, नारळ रस्त्यावर सर्वत्र पसरले होते. यावेळी औरंगाबाद येथील राठोड नावाच्या एका वाहनचालकाने व परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनचालकांना धीर दिला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील नारळ चोरून नेले.

===Photopath===

050321\052_bed_20_05032021_14.jpg

===Caption===

अपघातातील ट्रक व पसरलेले नारळ दिसत आहेत

Web Title: Accident to a truck carrying coconuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.