शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 19:25 IST

आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात कारवाई करण्यात आली

- नितीन कांबळेकडा - प्रवास भत्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपीकाने लाच मागितली तर धनादेश प्रदान करण्यासाठी दुसर्‍या लिपीकाने पंचासमक्ष लाच स्विकारली याप्रकरणी आष्टी येथील लघुपाट बंधारे विभागातील दोघाजणांवर एसीबीने आज दुपारी कारवाई केली. आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लिपिक कुंदन अशोक गायकवाड आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरुड असे लाचखोर लिपीकांची नावे आहेत.

तक्रारदाराचा प्रवास भत्ता देयकाचा 19 हजार 410 रुपयांचा धनादेश मंजूर केल्याचा मोबदला म्हणून कुंदन अशोक गायकवाड ( प्रथम लिपिक, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद)  आणि पोपट श्रीधर गरुड ( वरिष्ठ लिपिक, लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी, जि बीड ( वर्ग -३) यांनी फोनवर २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क केला. दरम्यान, पोपट चौधरी याने तक्रारदार यांना मंजूर झालेला  १९ हजार ४१० रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वतः व कुंदन गायकवाड यासे मिळून एकत्रित असे २० टक्के प्रमाणे ३ हजार ८८२ रुपयांची मागणी करून ३ हजार ८८० रुपये स्विकारण्याचे मान्य केले.

आज एसीबीने आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात सापळा लावला. ३ हजार ८८० रुपयांची लाच स्विकारताच एसीबी पथकाने पोपट गरुड यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. ही कारवाई  संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड , अमोल खरसाडे,  गणेश मेहेत्रे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग