शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

खरिपासाठी येणार ५९ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 8:22 PM

आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. 

ठळक मुद्दे समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे.यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

- प्रभात बुडूख

बीड : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. त्यामुळे पिके देखील जोमात आली होती. आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. 

गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे नगदी पीक असणारे कापूस पिकाचे क्षेत्र ३ लाख २९  हजार ३०० हेक्टर इतके होते. मात्र, कापसावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामासाठी कापुस बियाणांचे यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

सोयाबीन पिकाची लागवड देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी महाबीजकडून ३० हजार क्ंिवटल तर खाजगी कंपनीकडून १३ हजार ६९९ क्विंटल असे एकूण ४३ हजार ६९९ क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये इतर खरीप पिकांचे देखील बियाणे मागवण्यात आले आहे. त्यासोबतच तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, तीळ, बाजरी या पिकांचे बियाणे देखील मागवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कोणती खते घ्यावीत, बियाणे घेताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

काही पिकांवर पडलेल्या रोगांमुळे पीक नष्ट होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे घेतलेल्या  बियाणांची पावती पीक निघेपर्यंत जपून ठेवावी. जेणेकरून त्याच्याच विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मदत होईल. तसेच किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.  

खते - बियाणे खरेदी करताना....खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाणांमघ्ये शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.त्याच सोबत खरेदीची पावती, खरोदी केलेल्या बियाणे किंवा खत पाकिटाचे सील, टॅग, लॉट नंबर तपासून घ्यावे. तसेच ही पावती पीक कापणीपर्यंत  जपून ठेवावी. तसेच एक्सपायरी डेट पाहूनच बियाणे व खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशी आहे मागणीयावर्षी २६०,७५८ मे.टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ५२ हजार ५५१ मे.ट, डीएसपी १८ हजार ५६० मे.ट, एमओपी ३ हजार २४३ मे.ट, व इतर संयुक्त व मिश्र खतांचा समावेश आहे.

खात्री करून खरेदी करावी शेतकऱ्यांनी बियाणांमधील भेसळीपासून वाचण्यासाठी बियाणांची पाकिटे व खताची गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी. तसेच अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करून पावती घ्यावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही. - डी. बी. बिटके, कृषी विकास अधिकारी, जि.प.बीड 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र