पळवून नेऊन विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST2021-05-18T04:35:13+5:302021-05-18T04:35:13+5:30

केज : तालुक्यातील एका १९ वर्षीय विवाहितेस जीवे मारण्याची धमकी देत, पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ...

Abducted and tortured married | पळवून नेऊन विवाहितेवर अत्याचार

पळवून नेऊन विवाहितेवर अत्याचार

केज : तालुक्यातील एका १९ वर्षीय विवाहितेस जीवे मारण्याची धमकी देत, पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात रविवारी दोघांविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील १९ वर्षीय विवाहितेस बंडू राजाभाऊ चौरे (रा.जिवाचीवाडी ) व सहदेव आश्रुबा आंधळे (रा.आंधळ्याचीवाडी) यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तिला मोटारसायकलवर बसवून कराड तालुक्यातील मल्हार पेठ येथे घेऊन गेले. तेथे एका खोलीत ठेऊन ती गरोदर असल्याची माहिती असतानाही तिच्यावर बंडू राजाभाऊ चौरे याने अत्याचार केला. ही घटना दिनांक १ मे, २०२१ ते १६ मे, २०२१च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात बंडू राजाभाऊ चौरे व सहदेव आश्रुबा आंधळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना केज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी भास्कर सावंत हे करीत आहेत.

Web Title: Abducted and tortured married