शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

तरुणाला अमानुष मारहाण प्रकरण; धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:36 IST

धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल; दादा खिंडकरविरोधातही गंभीर गुन्हे दाखल आहेत

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या सरपंच दादासाहेब खिंडकर यांचाही एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये खिंडकरसह पाच ते सहा जणांकडून एका तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असून, हा वाद मिटल्याचा खुलासा खिंडकर यांनी केला आहे. दरम्यान, खिंडकर यांच्यावरही जीव घेणा हल्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी दादा खिंडकर पोलिसांना शरण आला. त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव ओमकार सातपुते असे आहे. त्याने एक व्हिडीओ केला होता. त्याचाच राग मनात धरून दादा खिंडकर आणि त्याच्या साथीदारांनी सातपुते याचे अपहरण करून शेतात नेले. तेथे नेऊन त्याला बेल्ट, वायर, पाइप, काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एक पोलिस कर्मचारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. काळा शर्ट घातलेली व्यक्ती सिगारेट ओढत असतानाच त्याला मारहाण करीत आहे. हाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. खिंडकर हे धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. त्यामुळे त्यांचीही गुंडगिरी बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. धनंजय देशमुख यांनी यावर बोलणे टाळले आहे.

घरात घुसून मारहाणअसाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, पाच ते सात तरुण हे काठ्या, तलवारीसह इतर हत्यारे घेऊन एका जीपवर मारत आहेत. तसेच दोन ते तीन जण भिंतीवरून पहिल्या मजल्यावर चढले. यामध्येही खिंडकर असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

दादा खिंडकरविरोधात १२ गुन्हेदादा खिंडकर यांच्याविरोधातही तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पिंपळनेर पाेलिस ठाण्यात ६, बीडमधील शिवाजीनगर ठाणे ४ आणि पेठबीड ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. शासकीय नौकरावर जिवघेणा हल्ला करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लुट करणे अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

खिंडकरचा व्हायरल व्हिडिओवर खुलासा मी सुरुवातीपासूनच देशमुख कुटुंबासोबत आहे. त्यांच्यापासून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. हा व्हिडीओ माझा नाही. जो वाद होता तो आमच्या गावातील आणि कुटुंबातील होता, तो आता मिटला आहे. मला आणि देशमुख कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा खुलासा दादासाहेब खिंडकर याने केला होता. मात्र, आज सकाळी खिंडकर पोलिसाला शरण आला. त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या