किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 05:22 PM2023-04-17T17:22:44+5:302023-04-17T17:23:16+5:30

११ महिन्याचा करार; डोंगरपिंपळा येथील ग्रामपंचायतचा गाळा

A village with a population of 4,500 and a bid of around 30 lakhs for a tea shop in Beed Dist | किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली

किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली

googlenewsNext

- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई -:
अंबाजोगाई तालुक्यातील  डोंगरपिंपळा ४५०० लोकसंख्या असलेलं गांव.गावात ग्रामपंचायत ने बांधलेले चार व्यापारी गाळे. त्यातही एका गळ्यासाठी चक्क ३० लाखांची बोली.ते ही ११ महिन्यांचे भाडे.एका चहाच्या टपरीसाठी.आहे न आश्चर्य ? नव्हे वास्तव.

अंबाजोगाई तालुक्यातील  डोंगरपिंपळा ४५०० लोकसंख्या असलेलं गाव.गावची मतदार संख्या २३०० च्या आसपास. गावच्या ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व ग्रामपंचायत ला उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कर्यालया लगत ४ व्यापारी गाळे १० बाय १० आकाराचे बांधण्यात आले आहेत.हे गाळे ग्रामपंचायत ने ११ महिन्यांच्या करारावर भाड्याने दिलेले आहेत.या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स,सलून अशी दुकाने आहेत.आज सोमवारी ग्रामपंचायत च्या वतीने या गाळ्यांचा सार्वजनिक लिलाव रितसर झाला.ज्या व्यापाऱ्यांना अथवा गाळा भाड्याने पाहिजे आहे.त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बोली बोलण्यासाठी ५ हजार रुपये रक्कम भरून घेण्यात आली. जवळपास १० जन यात सहभागी झाले.बोली वाढत गेली. तसे एकमेकांचे आकडे ही वाढू लागले.एकाच गाळ्यासाठी एका चहाच्या टपरी वाल्याने ३०लाखाची बोली बोलून ही प्रक्रिया थांबविली.तर दुसऱ्या क्रमांकाची बोली ही २५ लाखांवर जाऊन पोहोंचली. हा प्रकार पाहून उपस्थित ग्रामस्थ ही थक्क झाले. महानगरात ही भाडे नसावे इतकी बोली ग्रामीण भागात बोलली जाते.याला म्हणायचे तरी काय..

रक्कम भरण्यासाठी दिली आठ दिवसांची मुदत
या प्रकरणाची माहिती डोंगरपिंपळा गावचे ग्रामसेवक नागनाथ धीरे यांच्याकडे विचारली असता हा लिलाव आज सकाळी झाला.ज्या व्यक्तीने ३० लाखाची बोली बोलली.त्यांना ग्रामपंचायत कडे रक्कम जमा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.तर याच गळ्याला दुसरी मागणी २५ लाखांची आहे.असे त्यांनी सांगितले.

Web Title: A village with a population of 4,500 and a bid of around 30 lakhs for a tea shop in Beed Dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.