शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये सलोख्याचा भाव; पोलिसांच्या छातीवरील नेमप्लेटवरून वगळले आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:13 IST

पोलिस अधीक्षकांची संकल्पना यशस्वी; टेबल अन् छातीवरही पहिल्याच नावाची प्लेट

बीड : आडनावावरून काही लोकांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जातीचे आरोप केले. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पहिल्या नावाने बोलण्यासह टेबलवर नेमप्लेट देण्याचा निर्णय घेतला. आता टेबलवर तर नेमप्लेट दिलीच परंतु छातीवरही पहिल्या नावाची प्लेट लागली आहे. अशी संकल्पना राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये राबविण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या जातीयवाद वाढत चालला आहे. मागील आठवड्यापासून तर सोशल मीडियावर प्रचंड आरोप-प्रत्यारोप, अश्लील भाषा वापरली जात आहे. तसेच एखाद्याने पोलिसांबद्दल पोस्ट टाकली की त्याखाली जातीवाचक कॉमेंट्स केल्या जात आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही असे अनेकदा झाले होते. यावर नूतन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी हा जातीयवाद संपविण्यासाठी पोलिस दलातील प्रत्येकाने एकमेकांना पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढला. त्यानंतर त्यांना टेबलवर ठेवण्यासाठी पहिल्या नावाची नेमप्लेट दिली. परंतु त्यानंतरही आता एक पाऊल पुढे टाकत खाकी वर्दीवर उजव्या बाजूला छातीवर असलेल्या नेमप्लेटमधूनही आडनाव वगळले आहे. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता पहिलेच नाव प्लेटवर ठेवले आहे.

संकल्पनेचे स्वागतपोलिस अधीक्षक काँवत यांनी राबविलेल्या या संकल्पनेचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. परंतु काही लोकांनी पोलिस नियमांवरही बोट ठेवले आहे. परंतु आपण हा निर्णय सकारात्मक भावनेतून घेतल्याचा दावा काँवत यांनी केला आहे.

आडनाव काढल्याचा परिणामएखादा गुन्हा दाखल करताना पीएसओ, तपास करताना अधिकारी, कर्मचारी किंवा बंदोबस्ताच्या ठिकाणी आडनाव पाहून काही लोक उगाचच टीका करतात. परंतु पोलिसांना कोणतीही जात नसते. जातीवर आम्ही काम करत नाहीत. जनतेची सुरक्षा करणे हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे हा जातीयवाद थांबवावा, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वातावरण नक्कीच सलाेख्याचे दिसेलपहिल्या नावाने बोलण्यासह इतर राबविलेल्या संकल्पना यशस्वी होत असल्याचे समाधान आहे. माझे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी याला प्रतिसाद दिला. आगामी काळात जिल्ह्यातील वातावरण नक्कीच सलाेख्याचे दिसेल, असा विश्वास आहे.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस