शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पोलिसाच्या टिप्परने पोलिसालाच उडविले, प्रकृती चिंताजनक

By सोमनाथ खताळ | Updated: April 27, 2023 18:12 IST

बीड शहरातील घटना : वाळू टाकून परत भरधाव वेगात जाताना दुचाकीला दिली धडक

बीड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने पाेलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. यात हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज दत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास बीड शहरातील नगर नाका येथे घडली. दरम्यान, हे वाळूचे टिप्पर एका पोलिस कर्मचाऱ्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या शिवाजीनगर पोलिसांनी ठाण्यात नेले आहे.

कृष्णा रूपणर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील दहा दिवसांपूर्वी रूपनर हे अमरावतीवरून बीडला बदलून आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. गुरूवारी दुपारी ते जेवणासाठी घरी जात होते. याचवेळी विना क्रमांकाच्या भरधाव आलेल्या टिप्परने रूपनर यांच्या दुचाकीला (एमएच ४४ एक्स ०३७३) धडक दिली. यात पाच ते दहा फुटापर्यंत दुचाकी फरटत नेली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार सोडगिर व त्यांच्या पथकाने त्याला आपल्या वाहनातून रूग्णालयात दाखल केले. रूपनर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक देणारा टिप्पर पोलिसांनी शिवाजीनगर ठाण्यात नेला आहे.

अवैध वाळू वाहतूक कधी थांबणार?रूपनर यांना धडक दिलेल्या टिप्परमधील वाळू खाली करून ते भरधाव वेगाने मिनी बायपास रोडने जात होते. यातच पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर चालक पसार झाला. दरम्यान, यापूर्वीही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अनेकांचा जीव घेतलेला आहे. आता ही मालिका कधी थांबणार? प्रशासनाला कारवाई करण्यासाठी आणखी किती लोकांचा बळी घ्यायचा आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रकरण मिटविण्यासाठी दबावअपघातातील टिप्परवर कसलाही नंबर नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार ते पोलीसाचेच असल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण वाढू नये, यासाठी जखमी कर्मचाऱ्यावर दबाव आणला जात आहे. गुन्हा दाखल न करता सर्व खर्च देऊ, असे प्रलोभण दिले जात आहे. तसेच एका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यानेही नियंत्रण कक्षाला हे प्रकरण मिटल्याची नोंद घ्या, असा संदेश दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAccidentअपघातPoliceपोलिस