बीड : जिल्ह्यात चालू वर्षात जातीय वादाचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक वादालाही काही लोकांनी जातीय रंग दिला. त्यामुळेच दोन समाज, दोन जातींमध्ये मारामाऱ्या, दगडफेकीसारख्या घटना घडल्या. २०२४ या चालू वर्षात जिल्ह्यात दखलपात्र व अदखलपात्र असे २३७ गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व कोण घडवतंय? असा सवाल उपस्थित होत असून, सामाजिक सलाेखा बिघडत चालल्याचे हे स्पष्ट दिसत आहे.
जिल्ह्यात सध्या किरकोळ कारणावरूनही मोठे वाद होत आहेत. सोशल मीडियावर एखाद्याने पोस्ट टाकली तर लगेच त्याला जातीय रंग देत दगडफेक, मारामारी अशा घटना घडत आहेत. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर याचे प्रमाण वाढले आहे. केज तालुक्यातील नांदूरघाटमध्ये तर मोठ्या प्रमाणात वाद होऊन दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांना चार ते पाच दिवस गावात तळ ठोकून राहावे लागले होते. अशाच घटना जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही घडल्या आहेत. राजकीय नेत्यांकडून आम्ही जातीयवाद करत नसल्याचा दावा केला जात असला, तरी सलोखा राखण्यासाठीही फारसे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच अशा जातीय दंगली घडत आहेत. आता सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे.
दोन समाजांतही वादजिल्ह्यात २०२४ मध्ये दोन समाजांतही वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अशा गुन्ह्यांची संख्या ही ३० आहे. लाेकसभा निवडणुुकीनंतर म्हणजेच जुलै महिन्यात सर्वाधिक ७ गुन्हे दाखल आहेत.
केज तालुका हॉटस्पॉटकेज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. याच केज तालुक्यात सर्वाधिक जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार झाला आहे. तसेच जातीय गुन्ह्यांमध्ये माजलगाव शहरातही सार्वाधिक अदखलपात्र २९ गुन्हे नाेंद आहेत.
सलोख्यासाठी एकत्र यावेजिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जातीय राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले; परंतु यामुळे जिल्ह्यातील सलोखा बिघडत चालला आहे. असे होऊ नये, यासाठी नेत्यांसह समाजातील प्रतिष्ठित लोक, तरुण, राजकीय नेते, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
२०२४ मधील जातीय गुन्हेप्रकार - गुन्हे - एकूण आरोपी - अटक आरोपीधार्मिक तेढ - ३४ - ५० - २७दखलपात्र - १११ - ३०० - ११८अदलखपात्र - १२६ - ०० - २६७ (जाब देणारे)