शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाला भीषण आग लागून २५ लाखांचा कपडा खाक; अर्ध्यारात्रीही अनेकजण मदतीसाठी धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:46 IST

अग्निशामक दलाच्या बंबाने तीन तास पाणी मारून आग आटोक्यात आणली 

अंबाजोगाई (बीड) : येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असलेल्या नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील कपड्याच्या दुकानाला सोमवारी रात्री अचानक आग लागली.या आगीत दुकानातील रेडिमेड कपडे व फर्निचर जळून खाक झाले. या दुर्घटनेत अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सलग तीन तास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी मारून आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  गणेश प्रभाकर राऊत यांचे आविष्कार मेन्स वेअर हे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे गणेश राऊत हे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. रात्री ११.३० वाजता त्यांच्या दुकानातून धुरांचे लोट निघू लागले. हे पाहून रात्रीची पेट्रोलिंग करणारे पोलिस व  बाजूच्या चहाच्या टपरीवाल्याने त्यांना फोन वरून ही माहिती दिली. गणेश राऊत यांनी धावत येऊन अग्निशामक दलाला संपर्क केला. मात्र तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत दुकानातील रेडिमेड कपडे, फर्निचर जळून खाक झाले. ही आग इतकी मोठी होती की अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तास पाणी मारण्याचे काम करावे.लागले. या आगीत राऊत यांच्या दुकानातील माल जळून अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा महसूल विभाग, व महावितरण यांच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचे रहस्य पोलीस तपासातूनच उलगडणार आहे.

अर्ध्या रात्रीही अनेकजण मदतीसाठी धावलेछत्रपती शिवाजीमहाराज चौकात मध्यरात्री ही दुर्घटना घडली. याची माहिती तात्काळ सर्वत्र प्रसारित झाली. घटनास्थळी अनेकांनी धाव घेत मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यकर्ते निलेश जगदाळे, कल्याण काळे  धनराज सोळंकी,शकील शेख,स्वपिल परदेशी,संतोष मोहिते,प्रवीण चोकडा, गोपाळ परदेशी,पतंगे असे सर्वजण मिळून मदतीसाठी धावून गेले. आग आटोक्यात आणण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांची पहाटे पर्यंत धावपळ सुरूच होती. घटनास्थळी  महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीज पुरवठा खंडित केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

टॅग्स :BeedबीडfireआगFire Brigadeअग्निशमन दल