शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला; घाटात ब्रेकफेल झाल्याने टँकर उलटला, इंधन रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 17:52 IST

आष्टी तालुक्यातील कारखेल येथील घटना

- नितीन कांबळेकडा (बीड):  अहमदनगरवरून डिझेल- पेट्रोल घेऊन बीडकडे निघालेला टँकर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बीड- नगर राज्य महामार्गावरील कारखेल येथील घाटात ब्रेकफेल झाल्याने एका घराला धडकून उलटला. 

अहमदनगर येथून डिझेल, पेट्रोल घेऊन एक टँकर ( क्रमांक एम.एच ०४,जे.के.७२६ ) बीड-नगर राज्य महामार्गाने बीडला जात होता. आष्टी तालुक्यातील कारखेल येथील एका वळणावर अचानक ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून  फुलाजी दगडू घुले यांच्या घराला धडकून उलटला. यात चालक अशोक बाळासाहेब माळी ( रा.चिंचोलीमाळी जि. बीड ) हा नशिब बलवत्तर म्हणून बचावला.  टँकरमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. माहिती मिळताच अहमदनगर व आष्टी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी झाल्या.

अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस हवालदार लुईस पवार, पोलीस अंमलदार अमोल शिरसाठ, सतिश पैठणे, बाळु जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

मोठी दुर्घटना टळली

कारखेल येथील गावात रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर लोक असतात. ऊन असल्याने दुपारी  रस्त्यावर कोणी नव्हते. जर हीच घटना सकाळी किवा सायंकळच्या दरम्यान घडली असती मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती असे प्रत्यक्षदर्शी नागरिक कैलास घुले यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेल एकाच टँकरमध्ये...

अपघातग्रस्त टँकरमध्ये वीस हजार लिटर पेट्रोल व डिझेल आहे.  पाच पाच हजार लिटरच्या चार कप्प्यात पेट्रोल-डिझेल एकाच टँकरमध्ये होते.