शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
2
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
4
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
5
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
6
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
7
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
8
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
9
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
10
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
11
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
12
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
13
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
14
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
15
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
16
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
17
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
18
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
19
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
20
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?

जमिनीच्या वादातून मागासवर्गीय कुटुंबावर जीवघेणा हल्ला; तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:39 IST

पतीवर हल्ला होत असताना पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण करत बाजूला केले.

दिंद्रुड (बीड):  जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांनी एका मागासवर्गीय कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथे गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. जबर मारहाणीत मागासवर्गीय शेतकरी पती-पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, उन्हाळा संपत आला असून खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे. शेतकरी शेत दुरुस्तीला लागले असून आहेत.  कोथिंबीरवाडी येथील शेतकरी बालासाहेब रोहिदास उजगरे हे गुरुवारी सकाळी शेतीत काम करत असताना शेजारील अजय भानुदास तिडके व सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरे यांच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. उजगरे यांनी त्यांना शेतात दगडे टाकण्यास मज्जाव केला. 

दगडे टाकण्यास अडविल्याचा राग आल्याने अजय भानुदास तिडके, सिद्धेश्वर भानुदास तिडके, मच्छिंद्र विठ्ठल तिडके, भानुदास विठ्ठल तिडके, चंद्रसेन विठ्ठल तिडके, रजनीकांत मच्छिंद्र तिडके, प्रतीक चंद्रसेन तिडके, अर्जुन कुंडलिक तिडके व कुंडलिक विठ्ठल तिडके ( सर्व राहणार बोडका, ता. धारूर ) यांनी उजगरे कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. जबर मारहाणीत बालासाहेब उजगरे, त्यांची पत्नी शकुंतला उजगरे, मुलगा निखील उजगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुरुवारी (दि.२६) रात्री बालासाहेब उजगरे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती आहे. 

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल उजगरे यांच्यावर नऊ जणांनी अचानक लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. पतीवर हल्ला होत असताना पत्नीने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण करत बाजूला केले. यानंतरही पत्नी हल्लेखोरांना विनवण्या करत होती. याकडे दुर्लक्ष करत कसलीही दया-माया न दाखवत हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळ करत, लाठ्याकाठ्या, दगडाने उजगरे कुटुंबास जबर मारहाण केली. या संतापजनक प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाFarmerशेतकरी