आष्टी तालुक्यात ११ दिवसात कोरोनाचे ९५ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:39+5:302021-03-13T04:59:39+5:30
कडा : मध्यंतरी कोरोनाचे संकट टळले असे बोलले जात असल्याने लोक बेफिकिरपणे वागू लागल्याने गेलेले संकट पुन्हा ओढावले ...

आष्टी तालुक्यात ११ दिवसात कोरोनाचे ९५ रूग्ण
कडा : मध्यंतरी कोरोनाचे संकट टळले असे बोलले जात असल्याने लोक बेफिकिरपणे वागू लागल्याने गेलेले संकट पुन्हा ओढावले असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात ११ दिवसात तब्बल ९५ कोरोना रूग्ण आढळून आल्याने पुन्हा धाकधूक वाढली आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात असली तरी लोकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर नियम पाळा नाहीतर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.
कोरोना टाळण्यासाठी असलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याने दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. शहरात नव्हे तर आता ग्रामीण भागात देखील रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यात नियमांचे पालन केले नाही तर मोठे संकट तालुक्यातील जनतेवर येणार आहे. कडा, आष्टी, धामणगाव, केळसांगवी, चिखली, हिंगणी, टाकळसिंग, बीडसांगवी, चिंचोली, पाटसरा, हातोला, साबलखेड, किन्ही, नागतळा, भातोडी, मेहकरी, खालापुरी, अरणविहरा, सालेवडगाव, देवळाली या गावात १ ते ११ मार्चपर्यंत कोरोना बाधित ९५ रूग्ण आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.
आतापर्यंत आष्टी तालुक्यातील कोरोना स्थिती
आरटीपीआर तपासणी- ६,५२८
बाधित ९२४,
ॲंटीजेन तपासणी १५,५१२
बाधित १२०
मृत्यू ४२