९२ नवे रुग्ण; रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST2021-08-17T04:39:21+5:302021-08-17T04:39:21+5:30
जिल्ह्यातील संशयित असलेल्या ४ हजार ८३१ लोकांची चाचणी करण्यात आली. यात ९२ जण पॉझिटिव्ह आले, तर इतर ४ हजार ...

९२ नवे रुग्ण; रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यातील संशयित असलेल्या ४ हजार ८३१ लोकांची चाचणी करण्यात आली. यात ९२ जण पॉझिटिव्ह आले, तर इतर ४ हजार ७३९ जण निगेटिव्ह आले. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १, आष्टीतील ३८, बीड ११, धारूर ५, गेवराई ५, केज ८, माजलगाव ४, पाटोदा १३, शिरूर ४, वडवणी ३ येथील रुग्णांचा समावेश आहे. साेमवारी १८७ रुग्णांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुदैवाने एकाही कोरोना बळीची नोंद आरोग्य विभागाकडे झाली नाही. आता एकूण बाधितांची संख्या ९९ हजार ८०१ एवढी झाली आहे. पैकी ९५ हजार २१४ कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ६८० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ९०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.