शहरांत ८३ तर ग्रामीणमध्ये १०१ टक्का पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:47+5:302021-02-05T08:26:47+5:30
बीड : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात १०१ टक्का तर शहरांत ८३ टक्के लसीकरण झाले. ...

शहरांत ८३ तर ग्रामीणमध्ये १०१ टक्का पोलिओ लसीकरण
बीड : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात १०१ टक्का तर शहरांत ८३ टक्के लसीकरण झाले. जिल्ह्यातील २३६३ बुथवर २ लाख १३ हजार बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला.
जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ८४ हजार ८८९ एवढी आहे. यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ लाभार्थी आहेत. त्यांना पोलिओ डोस देण्यासाठी जिल्ह्यात २ हजार ३६३ बुथचे नियोजन केले होते. मोबाईल टीम, ट्रांझीट टिमद्वारेही वाड्या, वस्त्यांवर जावून लसीकरण केले होते. सकाळपासूनच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी या लसीकरणात व्यस्त होते. पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरण यशस्वी करण्यात हातभार लावला. त्यामुळे जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सर्व टीमचे स्वागत केले.
फोटो क्रमांक ०१बीईडीपी १७ - लहान मुलाला पोलिओचा डोस देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते. सोबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डॉ.बाबासाहेब ढाकणे आदी.